तरुण भारत

श्रीलंकेतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द

कोलंबो / वृत्तसंस्था

पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवली गेलेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे रद्द करावी लागत असल्याची घोषणा श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे सीईओ ऍश्ले डीसिल्व्हा यांनी केली. या स्पर्धेची मागील आवृत्ती 2018 मध्ये झाली होती.

Advertisements

यंदा ही स्पर्धा जूनमध्ये होणे अपेक्षित होते. पण, कोरोनाच्या उद्रेकामुळे स्पर्धा रद्द करण्याशिवाय, आयोजकांकडे कोणताही पर्याय नव्हता. प्रारंभी, ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली गेली. पण, तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, हे लक्षात घेत स्पर्धा श्रीलंकेत घेण्याचे ठरवले गेले. आता लंकेत देखील ही स्पर्धा होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील आवृत्तीची आशिया चषक स्पर्धा आता 2023 मध्ये वनडे विश्वचषकानंतरच होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने सध्या लंकेत आंतरराष्ट्रीय प्रवासावर 10 दिवस बंदी आहे. पुढे, लंकेचा संघ बांगलादेश दौऱयावर जाणार असून त्यानंतर दुसऱया फळीतील भारतीय क्रिकेटपटूंचा संघ लंका दौऱयात खेळणार आहे.

Related Stories

टेनिस हंगाम पुढील मार्चपासून सुरू होणार

Patil_p

भारत-सर्बिया महिला फुटबॉल सामना आज

Patil_p

ऑलिम्पिकसाठी पांघलला टॉप सिडिंग

Patil_p

चौथ्या दिवशीही पाऊस ‘जिंकला’!

Patil_p

कर्णधार करूणारत्नेकडून प्रशिक्षक आर्थर यांची प्रशंसा

Patil_p

ऑलिम्पिक आयोजन समिती अध्यक्ष योशिरो राजीनाम्याच्या पवित्र्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!