तरुण भारत

कर्नाटकात बुधवारी ४९ हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी राज्यात ५८ हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तर बुधवारी राज्यात ४९ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट वाढला आहे. बुधवारी राज्यात ४९,९५३ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात बुधवारी ३४,२८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तसेच ४६८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण २३,३०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २३,०६,६५५ वर पोहोचली आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी ११,७७२ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. तर २९,२३८ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात १९ मे पर्यंत एकूण २३,०६,६५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली त्यापैकी १७,२४,४३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,५८,८९० इतकी आहे. राज्यात काराेना सकारात्मकतेचा दर २६. ४६ टक्के होता, तर मृत्यु दर १.३६ टक्के होता.

Advertisements

Related Stories

कर्नाटक : दक्षिण कन्नड जिल्हा प्रशासनाकडून केरळ सीमेवरील निर्बंध मागे

triratna

सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू, पण वर्ग नाही

Patil_p

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप

triratna

बेळगावात 29 मे रोजी होणार ‘खाण अदालत’

Amit Kulkarni

विविध निगम-मंडळे, प्राधिकरणांवर अध्यक्षांची नेमणूक

Patil_p

हिंसाचाराला सरकारचे अपयश जबाबदार : सिद्धरामय्या

triratna
error: Content is protected !!