तरुण भारत

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आज जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

जिल्ह्यातील कोरोनास्थिती, मृत्युदरासह उपाययोजनांबाबत घेणार आढावा

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

कोरोना संसर्गामुळे वाढणारी रुग्णसंख्या व मृत्युदरामुळे कोल्हापूर जिल्हा देशस्तरावर चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी (दि.20) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी `व्हीसी’द्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी जिह्यातील कोरोना स्थिती, मृत्युदर, रुग्णसंख्या यासह राबविल्या जाणाऱ्या नाविण्यपूर्ण व प्रभावी उपाययोजना यांचा आढावा पंतप्रधानांकडून घेतला जाणार आहे. दरम्यान सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही `व्हीसी’द्वारे याबाबत जिल्हाधिकार्यांकडून आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी हे गुरुवारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसह इतर 17 जिल्हाधिकाऱ्यांशी  `व्हीसी’द्वारे संवाद साधणार आहेत. त्याच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. येगेश साळे उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादरीकरण करावयाच्या बाबींवर चर्चा झाली.  यामध्ये जिह्यातील कोरोना रुग्णसंख्या व मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्या नाविण्यपूर्ण व प्रभावी उपाययोजना, यासह विविध उपक्रम आदी माहिती देण्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही `व्हीसी’द्वारे जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडून याबाबत संवाद  साधून आढावा घेतला.

Related Stories

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून कोरोना रुग्णाचे पलायन

triratna

देशाच्या विकासाच्या सर्व टप्प्यांमध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

triratna

कोल्हापूर : मोफत शिवभोजनचा पावणे दोन लाख जणांना लाभ

triratna

कोल्हापूर : लसीसाठी पहाटेपासून रांगेत..तरीही निराशा!

triratna

कुशिरे येथे प्लास्टो कंपनीची बनावट टाकी तयार करणारी कंपनी सील

triratna

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!