तरुण भारत

”गुजरातला मदत केल्याचे दु:ख नाही पण कधीतरी पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल”

मुंबई \ ऑनलाईन टीम

तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा, गुजरात व महाराष्ट्र राजाला मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला 1000 कोटींची मदत जाहीर केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत ते गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला 1500 आणि गोव्याला 500 कोटींची मदत करतील , असे वक्तव्य केले आहे. ते गुरुवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत. पंतप्रधान मोदींचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील. पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत देतील कारण गोव्यात व महाराष्ट्रात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला नक्की मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील उद्या, शुक्रवारी कोकणाचा दौरा करणार आहेत. ते कोकणातील परस्थितीचा अभ्यास करतील व केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 2 कोरोनाबाधितांची भर

triratna

नागपूरमध्ये उद्या आणि परवा ‘जनता कर्फ्यू’

Rohan_P

जिह्याचा लसीकरणात विक्रम

Patil_p

वळसे येथे महामार्गावर थरारक अपघात, भरधाव स्विफ्टने तीन दुचाकींना उडवले

triratna

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक- राजेश टोपे

triratna

नरेंद्र मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत; भातखळकरांचा पटोलेंवर पलटवार

triratna
error: Content is protected !!