तरुण भारत

कर्नाटक: नोव्हेंबर अखेरपर्यंत पात्र नागरिकांना कोरोना लस देण्याचे लक्ष्यः आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने नोव्हेंबरअखेर राज्यात पात्र असलेल्या सर्वांना कोरोना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी “आमचे प्रमुख उद्दिष्ट ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरअखेरपर्यंत पात्र सर्व लाभार्थ्यांना लसीकरण करणे हे आहे. आमचे सर्व प्रयत्न वर्षाच्या अखेरीस प्रत्येक नागरिकास लस देण्याच्या दिशेने आहेत,” असे त्यांनी बुधवारी सांगितले. ते पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून कोविशील्ड लसीचे दोन लाख डोस मिळाल्याची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

सुधाकर म्हणाले की, वर्षाच्या अखेरीस लसीकरण मोहीम साध्य करण्यासाठी लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा डोस देण्यास प्राधान्य असेल. याशिवाय भारत बायोटेक उत्पादित कोव्हॅक्सिनवर जोर देण्यात आला आहे. कोलारमधील मालूर येथे त्याचे उत्पादन युनिट सुरू करणार असून ऑगस्टअखेर त्यांची उत्पादन क्षमता चार ते पाच कोटींवर जाईल.तसेच स्पुतनिक लसीचे उत्पादनही कर्नाटकात होणार आहे. त्यामुळे लसीकरणाला गती मिळणार आहे.

राज्यात दोन्ही लसीचे उत्पादन सुरु झाल्यास लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे. लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण केले जाणार असून मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यात लसीचे उत्पादन घेण्यास सुरुवात होणार आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय ५ जून रोजी : मुख्यमंत्री

triratna

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार : २९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

triratna

कर्नाटकात रुग्णवाढ सुरूच; शुक्रवारी ८,९६० नवीन रुग्ण

triratna

राज्यात कोरोना रुग्णवाढीचे चक्र सुरूच

triratna

कर्नाटक विधानसभेचे सत्र १० फेब्रुवारीपर्यंत

triratna

कर्नाटक : राज्यात प्रवेश करण्यास कोणतेही बंधन नाही : आरोग्यमंत्री

triratna
error: Content is protected !!