तरुण भारत

शरद पवारांची केंद्रीय मंत्र्यांशी फोनवरून चर्चा; काही तासांतच खत दरवाढीचा निर्णय मागे


मुंबई \ ऑनलाईन टीम


मोदी सरकारने खतांच्या दरवाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. डीएपी खतांवर १२०० रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. डीएपीची एक पोतं आता २४०० ऐवजी १२०० रुपयांना मिळणार आहे. मोदी सरकारने हा निर्णय घेताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक ट्विट केलं आहे. केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवारांच्या पत्राची दखल घेतली असल्याचं, राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. एनसीपीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याविषयी मीहिती देण्यात आली आहे.

एनसीपीच्या अधिकृत ट्वीटर याविषयी माहिती देत म्हटले आहे की, रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय खत व रसायन मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती खासदार शरद पवार यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे केली होती.

या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शरद पवार यांना आश्वाशन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ट्विटनंतर काही तासांतच केंद्र सरकारने खत दरवाढीचा निर्णय मागे घेतला.

Advertisements

Related Stories

चिंता वाढली : धारावीनंतर आता ‘अंधेरी’ बनला मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट

Rohan_P

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 122 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत 3 रुग्णालये तातडीने उभारावीत : अजित पवार 

Rohan_P

भूमीपुत्रांना फौंड्रीच्या प्रशिक्षणासह नोकरीची हमी

triratna

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा फेरविचार करावा

Patil_p

कोरोना नियंत्रणासाठी टास्क फोर्स

Patil_p
error: Content is protected !!