तरुण भारत

कोरोनाबाधित मुलांवर घरातच उपचार शक्य; कशी करायची देखभाल ?

प्रतिनिधी / नवी दिल्ली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मोठ्या संख्येत मुलेही संक्रमित होत आहेत. अशा स्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बहुतांश मुलांची देखभाल आणि उपचार घरताच केले जाऊ शकतात, असे म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास किंवा कोरोनाबाधित आढळल्यास त्यांच्या देखभालीसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

कोरोनाने संक्रमित बहुतांश मुले लक्षणेरहित किंवा सौम्य लक्षणांनी ग्रस्त असू शकतात असे आरोग्य मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. आोर्गय मंत्रालयानुसार लक्षणेरहित कोरोना पॉझिटिव्ह मुलांची घरीच देखभाल केली जाऊ शकते. कुटुंबात अन्य कुणी कोरोनाबाधित आढळल्यावर सर्वांची चाचणी केली असता मुलांना झालेल्या संक्रमणाचा थांगपत्ता लागू शकतो. अशा मुलांमध्ये काही दिवसांनी गळ्यात वेदना, नाक वाहू लागणे, खोकला होऊ शकतो. काही मुलांचे पोटही बिघडू शकते. या मुलांना घरात आयसोलेट करून लक्षणांच्या आधारवर त्यांच्यावर उपचार केला जातो. अशा मुलांना ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेरासिटामोल दिले जाऊ शकते.

लक्षणेरहित मुलांच्या ऑक्सिजन पातळीवर ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने नजर ठेवली जावी. ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी होऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा. जन्मापासून हृदयविकार, दीर्गकाळापासून फुफ्फसांचा आजार, एखादा अवयव काम करत नसल्यास किंवा स्थुलपणाने ग्रस्त मुलांचीही डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच देखभाल केली जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार कोरोनाबाधित काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेंट्री सिंड्रोम (एमआयएस-सी) हा नवा सिंड्रोम दिसून आला, अशा प्रकरणांमध्ये मुलांमध्ये सातत्याने ३८ डिग्री सिल्सिअस म्हणजेच १००.४ डिग्री फेरनहाईटपेक्षा अधित ज्वर राहतो.

घरात अशा प्रकारे करा देखभाल..

आयसोलेशन

मलाला घरातच स्वतंत्र खोलीत आयसोलेट करा. जेणेकरून कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये संक्रमण फैलावू नये.

ताप

पॅरासिटामोलचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांना द्या. याकरता संसर्गाची लक्षणे विचारात घेतली जावीत.

आहार

मुलांच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी नारळाचे पाणी, डाळीचे पाणी, फळांच्या ज्यूससह पौष्टिक आणि सहज पचणारा आहार द्यावा.

आपत्कालीन

मुलांमधील लक्षणे तीव्र होऊ लागल्यास किंवा ऑक्सिजन पातळी खालावू लागल्यास त्वरित त्याला रुग्णालयात हलवा.

Advertisements

Related Stories

पुणेकरांना मोठा दिलासा, अजित पवारांच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय

triratna

देव तारी त्याला कोण मारी ; दरीत उडी घेणारी युवती सुखरूप

Ganeshprasad Gogate

सोलापूरात आजपासून कडक लॉक डाऊन

Rohan_P

UAE कडून मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन

prashant_c

मध्यप्रदेश : राज्यसभा निवडणुकीत सहभागी झालेले भाजपचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!