तरुण भारत

गुजरात : रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

ऑनलाईन टीम / वडोदरा : 


गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात डी केबिन रेल्वे एरियामध्ये एक अपघात झाला आहे. येथे रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रेल्वेच्या डब्यात दूरपर्यंत पसरली होती. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

Advertisements


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. याबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. 


पुढे ते म्हणाले, या घटनेचा तपास सुरु आहे. या प्रकारची घटना या आधी कधी झाली नाही. पाऊस पडत असून देखील अशा प्रकारची घटना का घडली याबाबत शोध सुरू आहे. 


तर आणखी एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले की, ‘तौक्ते चक्रीवादळा’मुळे मागील दोन दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला, आज परिस्थिती सुधारत आहे. अमरेली – वेरावल सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात माती आल्याने देखील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुढील आदेशापर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Related Stories

गुन्हय़ांमुळे त्रस्त महिलांच्या संयमाचा अंत

Patil_p

सोलापुरात आणखी तीघे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या 68 वर

triratna

33 ते 37 पैशांनी इंधन दरात वाढ

Amit Kulkarni

ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

देशात कोरोना संसर्ग घटतोय!

Patil_p

जगभरात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!