तरुण भारत

श्रीलंका दौऱ्याच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड यांची निवड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असलेली राहुल द्रवीड यांची भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास जाणार आहे. 

Advertisements


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघाच्या इंग्लंड दौऱ्यावेळी हुशारीने श्रीलंका दौऱ्याचे आयोजन केले आहे. जुलै महिन्यात जेव्हा भारताचा एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील.


श्रीलंका दौऱ्यातील संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आदी स्टार खेळाडू नसतील. या दौऱ्यात प्रत्येकी 3 टी- 20 आणि वनडे मालिका होणार आहे. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये असल्याने या संघात जसे स्टार खेळाडू असणार नाहीत तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड देखील असणार नाहीत. त्यामुळेच राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.


दरम्यान, राहुल द्रवीड यांनी याआधी भारताच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. राहुल हे बराच काळ भारत अ संघाचे प्रशिक्षक होते. त्यामुळे खेळाडूंना त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा घेता येईल, असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Related Stories

ऑलिम्पिक आयोजन समिती अध्यक्ष योशिरो राजीनाम्याच्या पवित्र्यात

Amit Kulkarni

नेपाळच्या पुरुष-महिला फुटबॉल संघांना समान वेतन

Patil_p

‘टॉप्स’मध्ये आणखी सहा ऍथलिटस्चा समावेश

Patil_p

अन्वर अलीचा वैद्यकीय अहवाल एएफसीकडे दाखल

Patil_p

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

Amit Kulkarni

कोरोनामुळे दोन पात्र फेरीच्या क्रिकेट स्पर्धा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!