तरुण भारत

”योगी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेवर संकटांचा डोंगर”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

कोरोना महामारीमुळे जनता अडचणीत सापडली असताना योगी सरकारने केलेले ढिसाळ नियोजनाने जनतेसमोर संकटांचा डोंगर उभारला आहे, असा थेट निशाणा प्रियांका गांधी वड्रा यांनी योगी सरकारवर साधला आहे. प्रियांका गांधी यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशातील कोरोना स्थितीवर प्रखर भाष्य करत टीका केली आहे.

या पत्रात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, एप्रिल मे दरम्यान कोरोना लाटेच्या अनुशंगाने योगी सरकारने कोणतेही नियोजन केलेले नव्हते, तसेच सुरु असलेल्या लाल फितीच्या कारभाराने हजारो – लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचबरोबर दुसऱ्या बाजुला कित्येक नागरिकांचे रोजगार गेल्याने निर्माण झालेली उपासमारीची अवस्था, वाढत असलेली महागाई, यामुळे नागरिकांचे खूप हाल सुरु आहेत. मध्यमवर्गातील ईमानदारीने कष्ट करून खाणाऱ्या नागरिकांना संपुर्ण उध्वस्थ केले आहे. विजेचे दर कमी करुन वीजबिलात सूट कशी देता येईल जेणेकरुन सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, याबद्दलही विचार करण्यास सांगितलं आहे.

सध्याच्या स्थितीमध्ये कल्याणकारी योजना राबवून या नागरिकांना मदत करण्याची गरज आहे. या संकट काळात त्यांना मदतीचा हात देत त्यांना उभे करण्याची गरज आहे. या संकट प्रसंगी जनतेला आधार देत या खोल कोरोना गर्तेतुन बाहेर पडण्यासाठी शासनाने सर्वेातोपरी मदत करणे आवश्यक आहे, असे सांगत प्रियांका गांधी यांनी या पत्रात योगी सरकारला काही सुचना देखील केल्या आहेत.

Advertisements

Related Stories

राधानगरीतील एकास कोरोनाची लागण,१४ वाड्यांवस्तीमध्ये खळबळ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढीचा आलेख वाढताच!

Rohan_P

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणाऱया दुचाकीचे उत्पादन सुरु करा

Patil_p

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”

Abhijeet Shinde

मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा

Rohan_P

नववर्षात रेल्वेप्रवास महागला

Patil_p
error: Content is protected !!