तरुण भारत

जिल्हा रूग्णालयात सर्वांची एकाच ठिकाणी तपासणी

प्रतिनिधी / सातारा

लहान मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. तरीही यांना जिल्हा रूग्णालयात इतर नागरिकांसोबत रांगेत उभे राहून टेस्ट करणे भाग पडत आहे. किमान या दोन घटकांसाठी तरी स्वतंत्र तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांची उपचारासाठी नेमणूक करणे आवश्यक आहे. 

Advertisements

जिह्यामध्ये सर्वाधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या या जिल्हा रूग्णालयातील या केंद्रावर होतात. सुरूवातीला केसपेपरसाठी, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱयाकडून रॅटची टेस्ट लिहून घेण्यासाठी, त्यानंतर प्रत्यक्ष रॅट टेस्टसाठीच्या रांगेत उभे राहवे लागते. रॅट चाचणीचा अहवाल येईपर्यंत नागरिकाला 15 ते 20 मिनिटे त्या परिसरातच बाजूला थांबावे लागते. रॅट टेस्ट पॉझिटिव्ह आली तर, औषधाच्या आरटीपीसीआर टेस्टचा फॉर्म भरून घेण्यासाठी रांग, ती झाली की आरटीपीसीआर किट मिळविण्यासाठी व नंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीच्या रांगेत नागरिकांना थांबावे लागते. जिह्यातील कोरोना बाधितांचा दर हा किमान 35 टक्क्यांच्या जवळ असतो. त्यामुळे दहा जणांच्या रांगेत किमान तीन तरी पॉझिटिव्ह नागरिक असतात. कितीही प्रयत्न केले तरी या रांगेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यातून कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे.

Related Stories

साताऱ्यात बॅरिटेकेट नुसतेच नावाला

Abhijeet Shinde

साताऱयातील युवकांना ल्हासुर्णेत नेवून मारहाण

Patil_p

कोटींच्या चीपची अफवा; चौघांना जेलची हवा

Patil_p

सहय़ाद्रि कारखान्यावर जिल्हा बँकेची खलबते

Patil_p

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Patil_p

कर्तृत्ववान स्रीला सातारा भूषण पुरस्कार हे मोठे औचित्य

Patil_p
error: Content is protected !!