तरुण भारत

जून 1 ते 6पर्यंत प्राप्तिकरचे पोर्टल राहणार बंद

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

प्राप्तिकर विभाग (इनकम टॅक्स डिपार्टमेंट) पुढील महिन्याच्या प्रारंभापासून करदात्यांसाठी एक नवीन ई-फायलिंग वेब पोर्टल सादर करण्याच्या तयारीत आहे. तसेच याचा वापर आयटीआर दाखल करण्यासाठी आणि अन्य करासंदर्भातील  कार्यासाठी होणार आहे. नवीन पोर्टलअंतर्गत अधिकची सुविधा प्राप्त होणार असून याकरीता वेब पोर्टल 1 ते 6 जून या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती गुरुवारी एका अधिकाऱयांनी दिली आहे.

Advertisements

प्राप्तिकर विभागाच्या सिस्टमद्वारे बुधवारी सादर करण्यात आलेल्या एका आदेशानुसार जुन्या पोर्टलमधून नवीन पोर्टलवर जाण्यासाठीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सहा दिवसांच्या कालावधीत प्राप्तिकरचे काम बंद ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. कोणत्याही प्रकरणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास त्यासाठी 10 जूननंतरच करावी लागणार आहे.

Related Stories

महाविकास आघाडी सरकारची सुंदोपसुंदी कधी संपणार

Patil_p

उत्सवासाठी ‘एलजी’कडून नवे टीव्ही बाजारात

Omkar B

लवकरच शाओमीचे एमआय नोटबुक-14 भारतात

Patil_p

वेगवान चार्जर्सचा येणार जमाना

Patil_p

टाटा मोटर्सकडून 21 नवीन व्यावसायिक वाहनांचे अनावरण

Patil_p

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p
error: Content is protected !!