तरुण भारत

गोव्यात 31 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

ऑनलाईन टीम / पणजी : 


कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत गोव्यातील कोरोना कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. याआधी 9 ते 23 मे दरम्यान राज्यात कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. 

Advertisements


प्रमोद सावंत म्हणाले, या काळात मेडिकल दुकाने,  किराणा मालाची दुकाने तसेच दारूची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच राज्य प्रशासनाने काही गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. तर कर्फ्यू दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती.


गोवा सरकारने वैद्यकीय सेवेस परवानगी दिली आहे. तसेच किराणा मालाची दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त रेस्टॉरारंटद्वारे डिलिव्हरीला परवानगी असेल. ज्यात ऑर्डर घेण्यासाठी सकाळची वेळ निश्चित करण्यात आली होती. 


यासोबतच बाहेरील राज्यातून गोव्यात येणाऱ्या नागरिकांकडे आपल्याला कोरोनाची लागण झालेली नाही असे 48 तासात घेतलेले प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे, तरच संबधित नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. 


तसेच कर्फ्यू काळात रेस्टॉरंट, बार, कॅसिनो, खेळाची मैदाने, ऑडिटोरियम, जीम, स्पा, थिएटर, मनोरंजन पार्क, मॉल, स्विमिंग पूल, स्कूल, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, धार्मिक स्थळे आणि बाजार देखील पूर्णपणे बंद असणार आहेत. 

Related Stories

आंध्र प्रदेश : ट्रक आणि ट्रॅक्टरच्या धडकेत सात जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Rohan_P

गोमंतक मराठा समाजाला निवडणुकपूर्वी ओबीसीचा दर्जा देण्यात यावा

Amit Kulkarni

हसन अखुंड होणार अफगाणिस्तानचे पंतप्रधान?

datta jadhav

स्वावलंबी, यशस्वीनी योजनांचा आज शुभारंभ

Patil_p

तरुणीचा मृतदेह ओहोळात, तरुणाची आत्महत्या

Patil_p

प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन

datta jadhav
error: Content is protected !!