तरुण भारत

माशेल जन्क्शन रस्त्यावर जांभळीचे झाड कोसळले

प्रसंगवधान साधल्याने आंबेविक्रेती महिला सुखरूप

वार्ताहर / माशेल

Advertisements

माशेल भागात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास वादळ, वारे व पाऊस नसताना  अचानक बेतकी-माशेल-पणजी रस्त्याच्या जन्क्शनवरील रस्तावर जांभळीच्या झाड कोसळले. यावेळी प्रसंगवधान साधून झाडाखाली आंबे विक्री करणाऱया धाव घेतल्याने तीचे प्राण वाचले. मात्र पार्क करून ठेवलेल्या दुचाकी व चारचाकीचे किरकोळ नुकसानी झाली.

  माशेल भागातील या जन्क्शनवर नेहमी वर्दळ असायची मात्र संचारबंदीमुळे वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. फक्त पार्क ठेवण्यात आलेली स्कूटर व अरूण खोलकर यांची एक चारचाकी कोसळलेल्या फांदीत अडकली. दोन्ही वाहनांची जबर नुकसानी झाली नाही. ऐरवी या जन्क्शनजवळून वळवई, पणजी, फोंडा येथे ये-जा करणारे प्रवासी झाडांच्या सावलीत विसावा घेत असतात. दैव बलवत्तर म्हणून आज एकही प्रवासी अथवा दुचाकी, चारचाकी पार्क करून ठेवण्यात आली नव्हती.

   यावेळी वाहतूक पोलिसांनी महत्वाचे मदतकार्य करताना झाडांच्या फांद्या, कापून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला. अग्निशामक दलाची वाट न पाहता फांद्या हटविण्यास सुरवात केल्याने वाहतूक पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले. लागलीच  माशेल वीज खात्यातील कर्मचारी येऊन त्यांनी रस्त्यावर पडलेल्या विद्युत वाहिन्या जोडणीचे काम केले. यावेळी बोलताना कारचालक अरूण खोलकर म्हणाले की मान्सनपुर्व कामे करताना विद्युत खात्यांने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावर नाक्याच्या ठिकाणी वाहतूकीला अडथळा ठरणारी झाडे हटवावी अशी मागणी केली आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये.

Related Stories

ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये

Amit Kulkarni

वृक्षतोड, जंगल जाळपोळीमुळे डोंगराना भूस्खलनाचा धोका

Amit Kulkarni

कामगारांचे वेतनाच्या मागणीसाठी काम बंद

Patil_p

सांखळी डॉ. हेडगेवार शाळेतर्फे ऑनलाईनद्वारे विविध सण साजरे

Patil_p

फोंडय़ातील सफा मशिदच्या तटबंदीचा भाग कोसळला

Omkar B

खाण लीज गौडबंगाल प्रकरणी सरकारला नोटीस

Omkar B
error: Content is protected !!