तरुण भारत

‘राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती न करणं हा घटनेचा भंग’

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्यात तौक्ते चक्रीवादळ, कोरोना महामारीचे संकट असतानाच दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. यातच गेल्या काही दिवसापासून शांत झालेल्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी याच मुद्यावरुन राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली. तर, या नियुक्तीसाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल कोश्यारी यांना दिलेत. 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे 12 नावे पाठवली. यावर राज्यपालांनी निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.

Related Stories

शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी करावा

triratna

कॅलिफोर्नियाहून आलेल्या त्या रुग्णाचा पहाटे मृत्यू ; रात्री आला होता निगेटिव्ह रिपोर्ट

triratna

… तर भ्रष्टाचारी सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे

pradnya p

सातारारोडमध्ये फरसाणा कंपनी आगीत खाक

Patil_p

अमेरिकेत हाहाकार : सलग दुसऱ्या दिवशी 2 हजार लोकांचा मृत्यू

prashant_c

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको : अमित देशमुख

pradnya p
error: Content is protected !!