तरुण भारत

अन्वी भूटानीची ऑक्सफोर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत बाजी

लंडन 

 ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मेगडलेन कॉलेजमधून मूळ भारतीय असणारी जीवशास्त्र विषयाची विद्यार्थीनी अन्वी भूटानी या विद्यार्थी संघटनेच्या पोटनिवडणुकीत अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. ऑक्सफोर्ड इंडिया सोसायटीची अध्यक्ष अन्वी भूटानी यांना 2021-22 शैक्षणिक सत्राच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाली होती. निवडणुकीमध्ये विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली असून गुरुवारी रात्री अन्वी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. पोटनिवडणुकीत यावेळी विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे. निवडणुकीत 3,708 मतापैकी 1,966 मते प्राप्त करत मोठा विजय अन्वीने मिळवला आहे. निवडीबद्दल आपण खूप समाधानी असल्याचे सांगत तिने येणाऱया शैक्षणिक सत्रात बऱयाच सुधारणा करण्याचे ठरवले आहे. तसेच नवनव्या योजनाही राबवण्याचा विचार तिने केला आहे. 

Advertisements

Related Stories

हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर लागणार ‘मेड इन चायना’चे लेबल

datta jadhav

घरातून बाहेर पडल्यास भरावा लागतो दंड

Patil_p

पाकिस्तान : नवे दिशानिर्देश

Patil_p

हॉलिवूडमधील ‘जेम्स बाँड’ काळाच्या पडद्याआड

Patil_p

फिलिपिन्स : कॅटॅन्डुआस बेटाला गोनी चक्रीवादळाचा तडाखा

datta jadhav

5 ऑगस्टला निवडणूक

Patil_p
error: Content is protected !!