तरुण भारत

आसाम-नागालँड सीमेजवळील चकमकीत डीएनएलएचे ६ दहशतवादी ठार

आसाम/ प्रतिनिधी

आसाममध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलाने या चकमकीत सहा अतिरेकी ठार केले. रविवारी झालेल्या चकमकीत सिक्स दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) चे सहा अतिरेकी ठार झाले आहेत. दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे. ही चकमक आसाम-नागालँड सीमेजवळ झाली. पश्चिम कार्बी आंग्लॉंग जिल्ह्यात सुरक्षा दलांसह अतिरेक्यांच्यात ही चकमकी झाली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डीएनएलएच्या अतिरेक्यांची माहिती मिळताच संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. ही कारवाई पश्चिम बंगाल कार्बी आंग्लॉन्गमधील अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रकाश सोनोवाल यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी आणि आसाम रायफल्सच्या पथकाने केली. यावेळी सुरक्षा अधिकारी आणि अतिरेकी यांच्यात गोळीबार सुरू झाला, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ज्यामध्ये मिचिबेलंग भागात अतिरेकी संघटनेचे ६ अतिरेकी ठार झाले. कारवाईनंतर एके-47 रायफल्स आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मिचिबेलंगमध्ये अजूनही शोध मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

विजयन सरकारकडून शिष्टाचाराचा भंग

Patil_p

10 लाख तरुण-तरुणींना कायमस्वरुपी नोकरी देणार

Patil_p

‘या’ लसीपासून अर्धांगवायूचा धोका!

datta jadhav

गर्भपातासाठी 24 आठवडय़ापर्यंत मुदतवाढ

Patil_p

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

Abhijeet Shinde

केरळ : पायलटच्या सतर्कतेमुळे बचावले 104 प्रवाशी

datta jadhav
error: Content is protected !!