तरुण भारत

वाई येथे अवैद्य लाकुड वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई, सव्वातीन लाखाचा मुददेमाल जप्त

प्रतिनिधी / वाई

वनपरीक्षेत्रात विनापरवाना लाकूड वाहतूकीवर कारवाई करून लाकूड व टेम्पो सह सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवार दि. २२ रोजी वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी वाई ते सुरुर रस्त्याने गस्त घालत  असताना रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास शहाबाग गावचे हद्दीत  टेम्पो क्रमांक एमएच 11 एम ५१०३ या वाहनाची तपासणी केली असता. सदर वाहनात आंबा, लिंब, रामफळ, चिंच, उंबर इत्यादी जातीचा लाकुडमाल विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

Advertisements

टेम्पोचालक आरोपी राजेंद्र नाथ्याबा नेवसे रा.  खंडाळा जि. सातारा याचेकडे सदर लाकुडमालाचा वाहतूक आढळून आला नाही  त्याच्यावर  भारतीय वनअधिनियम, नुसार  वनगुन्हा नोंद केला असून  टेम्पो  लाकूड मालासह जप्त करण्यात आला आहे.  गुन्ह्यात लाकूडमाल व टेम्पो मिळून  सव्वातीन लाख किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.  सदर कारवाई उपवनसंरक्षक सातारा एम. एन. मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एन. गोसावी यांच्या  मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, वनरक्षक वैभव  शिंदे,  वसंत गवारी, वनसेवक सुरेश सपकाळ यांनी सहभाग घेतला. 

Related Stories

पाच वर्षाच्या चिमुकल्याने सर केला ऐतिहासिक किल्ले वासोटा

triratna

सातारा शहरातील कायदा, सुव्यवस्थेचे ऑडिट करा

Patil_p

सातारा : … सगळेच म्हणतात; आंदोलन झालेचं पाहिजे

datta jadhav

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

triratna

सातारा : राजधानी किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडला नवा चौथरा

triratna

सातारा : जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या योद्यांचे कार्य आदर्शवत – आ. शिवेंद्रसिंहराजे

triratna
error: Content is protected !!