तरुण भारत

देवरुख, साडवली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळी 9 वाजून 10 मिनिटाला जाणवला धक्का

वार्ताहर/ ताम्हाणे

Advertisements

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आता वातावरणात बदल झाला आहे. दोन दिवस पावसाचा जोर होता. शुक्रवारी, शनिवारी चांगले ऊन पडले असतानाच रविवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. 

  हा धक्का विशेष करुन उंच इमारतीत राहणाऱया नागरिकांना तत्काळ जाणवला. काही घरात भांडी ठेवण्याचे रॅक हलल्याने भांडय़ांच्या आवाजाने नागरिकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरिकांना जाणवला. भूकंपामुळे काही काळ नागरिक धास्तावले होते.

Related Stories

जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

दापोलीत मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरूच

Patil_p

खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

Patil_p

लोककलावंतांच्या मदतीला धावले ना. उदय सामंत

Abhijeet Shinde

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये हृदयशास्त्र विभाग सेवा

NIKHIL_N

घरपट्टी विरोधाचा ठराव सहा महिन्यापूर्वीच

NIKHIL_N
error: Content is protected !!