तरुण भारत

मुंबईत आजपासून तीन दिवस ‘वॉक इन’ लसीकरण

  • मुंबई महापालिकेकडून लसीकरणाचे सविस्तर वेळापत्रक जारी 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबईतील लसीकरण मोहीम अधिक सुरळीतपणे पार पाडावी यासाठी मुंबई महापालिकेकडून सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार मुंबईत आज पासून म्हणजेच सोमवार 24 मे ते 26 मे असे सलग 3 दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे. यानंतर 27 ते 29 मे 2021 या 3 दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण होणार आहे. तसेच रविवारी (30 मे 2021) रोजी लसीकरण बंद असणार आहे.

Advertisements


‘वॉक इन’ मध्ये ह्यांना मिळणार संधी 

  • 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
  • 60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी
  • आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  • 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी


त्यासोबत, ‘कोवॅक्सिन’ लसीचा विचार करता
  • सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.
  • 27 ते 29 मे या दिवसात प्रत्येक केंद्रावर 100 % लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.

रविवार, 30 मे रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील. 

आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आधी प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.


दरम्यान, केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या 6 ते 8 आठवड्यांऐवजी आता किमान 12 ते 16 आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर 84 दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.


ही बाब लक्षात घेता, 1 मार्चपासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी दिनांक 1 मार्च 2021 रोजी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास, त्यांना दिनांक 24 मे 2021 अथवा 84 दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.


कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या नियोजनाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

datta jadhav

स्विगीची सेवा आता 125 शहरांमध्ये

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांवर

datta jadhav

अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यास केंद्राचा नकार

Patil_p

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

triratna

राजीनाम्याचा प्रश्नच नाही!

Patil_p
error: Content is protected !!