तरुण भारत

रेमडेसिवीरच्या वितरणासाठी तंत्रज्ञान आधारित प्रणाली विकसित

बेंगळूर : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱया रेमडेसिवीरच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञान आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ट्विटरवर दिली. कोरोनाबाधित व्यक्तीच्या नावाखाली कोणत्या रुग्णालयाला रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, याची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. सार्वजनिकांनी http://covidwar.karnataka.gov.in/service2 या लिंकद्वारे आपल्याला वितरीत झालेल्या रेमडेसिवीरची माहिती घेऊ शकतात. एखाद्यावेळेस एसआरएफ आयडीद्वारे कोरोनाबाधित व्यक्तीला रेमडेसिवीरचे वितरण होऊनदेखील रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार न केल्यास याच लिंकद्वारे सरकारकडे तक्रार करण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे. या पारदर्शक व्यवस्थेमुळे काळाबाजारात विक्री होत असलेल्या रेमडेसिवीरवर चाप बसणार आहे.

Related Stories

निजद-काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी ‘पेगासस’चा वापर?

Amit Kulkarni

तीन वर्षात 12.36 लाख बोगस बीपीएल कार्डे रद्द

Amit Kulkarni

अध्यादेश काढून सरकार चालवणे हा लोकशाहीचा अपमान

Abhijeet Shinde

बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २४ मार्चला

Abhijeet Shinde

कर्नाटक: विधान सौध येथे काँग्रेस आमदारांनी केली निदर्शने

Abhijeet Shinde

काँग्रेसमधील 15-20 आमदार संपर्कात : नलिनकुमार कटील

Amit Kulkarni
error: Content is protected !!