तरुण भारत

लॉकडाऊन काळात शिवारात रंगताहेत पाटर्य़ा

वडगाव, शहापूर, येळ्ळूर रस्त्यावरील शिवारात मद्यपी ठाण मांडून

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मात्र मद्य पिण्यासाठी लॉकडाऊनची संधी शोधत तरुण मद्यपी शिवारात जाऊन मद्य ढोसण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अशा मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आता प्लास्टिकचे युग असल्यामुळे प्लास्टिकचे ग्लास, मिनीरल वॉटर मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात बार बंद असल्यामुळे हे साहित्य घेवून अनेक जण शिवारामध्ये मद्य ढोसत बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे लॉकडाऊन म्हणजे मद्यपींना एक संधीच मिळाली आहे. मात्र यामुळे शिवारात काम करणाऱया शेतकऱयांना, महिलावर्गाला त्याचा त्रास जाणवू लागला आहे.

वडगाव-येळ्ळूर तसेच वडगाव-यरमाळ रस्त्यावर आणि सध्या हलगा-मच्छे बायबास रस्त्यावर हे तरुण बसत आहेत. बिनधास्तपणे मद्य ढोसणे, शिगार ओढणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे येणाऱया पिढीवर त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्मयता आहे. याचबरोबर त्याचा शेतकऱयांना त्रास होत आहे. तेव्हा याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

शेतकऱयांना मात्र नाहक त्रास देवू नका

शेतकरी हे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी जात असताना पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. शेतकऱयांकडे कोणतेच ओळखपत्र नसते. तेव्हा शेतकरी आहे म्हणून खात्री झाल्यानंतर त्याला जाण्यास मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा असे मद्यपी नामानिराळे राहतील आणि शेतकऱयांना नाहक त्रास होईल. तेव्हा पोलिसांनी कारवाई करताना शेतकरी कोण आणि असे मद्यपी कोण? याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

सीमाहद्दीवर वाहनधारकांची अडवणूक

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ातील नऊ तालुके होणार खुले

Rohan_P

केदनूर येथे गांजा विकणाऱया तिघा जणांना अटक

Patil_p

खानापूरमधील एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका

Patil_p

गडकिल्ले तटबंदीचे होणार अचूक मोजमाप

Omkar B

परमहंस गुप्तानंद महाराज यांची 69 वी पुण्यतिथी

Omkar B
error: Content is protected !!