तरुण भारत

सोलापूर ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती ः कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयातच उपचार घेणे बंधनकारक

प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण व मृतांचा आकडा वाढत चाललेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कडक अंमलबजावणी करीत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील होम आयसोलेशन बंद होणार असून कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचार घेणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोचत नाहीत आणि घरीच उपचार घेत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना आता कोविड केअर सेंटर आणि संबंधित रुग्णालयात उपचार घेणे बंधनकारक असणार आहे.

जिह्यात आतापर्यंत 14 लाख जणांना गृह विलगीकरणमध्ये ठेवण्यात आले होते. यापैकी 12 लाख जण बरे झाले आहेत. अद्याप एक लाख 14 हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे आता सर्व होम आयसोलेशनमधील बाधित रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सौम्य लक्षण असणाऱयांना इन्स्टिटÎूशनल सेंटरमध्ये तर गंभीर लक्षणे असणाऱयांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील शाळा, महाविद्यालय, मंदिर, मंगल कार्यालय यांचा देखील उपयोग इन्स्टिटÎूशनल सेंटरसाठी करावा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

अक्कलकोट शहर – तालुक्यात आज ७ कोरोना रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

स्वच्छता उपकर रद्द करा अन्यथा महापालिका चालू देणार नाही : कॉ. नरसय्या आडम मास्तर

Abhijeet Shinde

मंदिरे खुली करण्यासाठी भाविक वारकरी मंडळाचे भजन आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना लस मोफत द्या- ॲड रेवण भोसले

Abhijeet Shinde

आषाढीसाठी आलेल्या कुकूरमुंडे महाराजांना पालिकेने पाठवले परत

Abhijeet Shinde

नागरिकत्व कायद्याबाबत शिवसेनेची भूमिका कलुषित : आठवले

prashant_c
error: Content is protected !!