तरुण भारत

लॉकडाऊनसंदर्भात जिल्हाधिकाऱयांचा आदेश

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावसह कर्नाटकात कोरोना महामारी थोपविण्यासाठी चौदा दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. सोमवारी त्याची मुदत संपणार होती. आता आणखी चौदा दिवसांसाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला असून जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे.

Advertisements

12 मे च्या रात्री 9 पासून 24 मे च्या सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. आता 24 मे च्या सकाळी 6 पासून दि. 7 जूनच्या सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आली आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.

Related Stories

वनवासमाचीच्या 11 जणांसह 12 जणांना डिस्चार्ज

Patil_p

शहराला पाच दिवसाआड पाणी?

Omkar B

घरपट्टीवर नोव्हेंबरपासून 2 टक्के दंडव्याजाचा भूर्दंड

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

विणकरांच्या समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा – निवेदन

Patil_p

खानापूर तालुक्यात रविवारी 11 कोरोनाबाधितांची भर

Rohan_P
error: Content is protected !!