तरुण भारत

सांगली : नांद्रेतील पूरग्रस्त मदतीपासून अजूनही वंचित

प्रतिनिधी/नांद्रे

सन 2019 महापूर, 2020, 2021 मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या अस्मानी संकट आणि महामारीमुळे आर्थिक चक्र थांबल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच यंदाच्या संभाव्य महापूरांची टागती तलवार कायम आहे. मात्र, अजूनही सन 2019च्या महापूरातील बांधीत कुंटूबे, छोटे व्यापारी, शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

2019 च्या महापुरात झालेले नुकसान मोठे होते. महापूराच्या या तडाख्यात अनेक कुंटूबे उध्दस्त झाली. महापूरावेळी गावातील नेते, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था, आरोग्य विभाग व आदी सामाजिक संस्थानी विशेष कामगिरी करत लोकांना धीर दिला. मात्र मिरज तालुक्यातील काही नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला आहे. गावकामगार तलाठ्याच्या मणमाऩी कारभारामुळे गावातील अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित पूरग्रस्त करत आहेत. पालकमंञी जयंत पाटील, कुषीमंञी बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी यांनी या बाबत विशेष लक्ष घालावे.

Related Stories

सांगली : जमिनीच्या वादातून निमसोड येथे सख्या चुलत भावाचा खून

Abhijeet Shinde

मुख्याध्यापक महामंडळाचे राजाध्यक्ष विजयसिंह गायकवाड कालवश

Abhijeet Shinde

सांगली : पलूस तालुक्यात ६ नवे कोरोना बाधीत

Abhijeet Shinde

सांगली : कृषिपंपांची ७२० कोटी थकबाकी माफ होणार

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत संततधार पावसाने दैना

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये बंद फ्लॅट फोडला: तीन लाखांची रोकड लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!