तरुण भारत

सांगली : नांद्रेत गव्याचा वावर, शेतकरी धास्तावला

प्रतिनिधी/नांद्रे

नांद्रे (ता. मिरज) येथील नेंमगोंडा उप्पाध्ये यांना सकाळच्या सुमारास शेतात गव्याचा वावर दिसून आला. उप्पाध्ये यांना गवा दिसताच ते भयभीत होऊन पळत सुटले. यानंतर त्यांनी शेतात गव्याचा वावर असल्याची मीहिती गावकऱ्यांना दिली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी 7 च्या दरम्यान बिसूर मागे गवा नांद्रेयात आल्याचे अनेकांनी पाहिले. हा गवा ऊस क्षेञातून फिरत असल्याने शेती पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. यातच कोरोना, लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटाच्या खाईत गेला असतानाच गव्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वनविभागाने याची तात्काळ दखल घेत या गव्याचा बदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Related Stories

गणेशोत्सवानंतर सांगलीकरांना वेध नवरात्रौत्सवाचे..!

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा 11 वा बळी, 7 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

सांगली : अभिनेते अमीर खान करमाळे येथे देणार भेट

Abhijeet Shinde

कृष्णा-वारणेतून २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा ;तहसीलदारांना निवेदन

Abhijeet Shinde

जत तालुक्यात नऊ हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!