तरुण भारत

उत्तराखंडातील लॉकडाऊनमध्ये वाढ; 1 जूनपर्यंत निर्बंध कायम

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, तरी देखील रुग्ण संख्या लक्षात घेत उत्तराखंड सरकारने लॉकडाऊनमध्ये एक आठवड्याची वाढ केली असून सध्याचे निर्बंध 1 जून पर्यंत वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती तीरथ सिंह रावत सरकारचे प्रवक्ता सुबोध उनियाला यांनी सोमवारी दिली. 

Advertisements


याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, यासोबतच बाजार सुरु ठेवण्याच्या वेळेत देखील बदल करण्यात आला असून आता सकाळी 8 ते 11 या वेळेत बाजार भरणार आहेत. यापूर्वी हा वेळ सकाळी 7 ते 10 इतका होता. 

तसेच विवाह समारंभात सहभागी होताना 72 तासांपूर्वी केलेली आरटी – पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम विधीमध्ये सहभागी होण्यासाठी ई पास घेणे आवश्यक करण्यात आले आहे. यासोबतच बँकांची वेळ पहिल्या प्रमाणेच सकाळी 10 ते दुपारी 2 इतकी असणार आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात प्रदेशात 3,050 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 53 जणांनी आपला जीव गमावला. तर सद्य स्थितीत प्रदेशात 54,735 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 2,47,603 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.98 % इतके आहे. 

Related Stories

पाकिस्तानात अफगाणी राजदूताच्या मुलीचे अपहरण

datta jadhav

न्यायवृंदाकडून 8 मुख्य न्यायाधीशांच्या नावांची सूचना

Patil_p

उत्तर प्रदेशातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा

Rohan_P

निष्पापाला पाहून मारेकऱयाचे मन बदलले

Patil_p

भोपाळच्या रुग्णालय आगीत 4 बालकांचा मृत्यू

Patil_p

कोरोनाचा कहर : बुधवारी 9,855 नवे रुग्ण; 42 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!