तरुण भारत

रहिमतपूर नगरपालिका करतेय सातारा का नाही?

प्रतिनिधी / सातारा :  

लॉकडाऊन काळात व्यापारी अडचणीत आले. त्यांना मदत म्हणून व्यापाऱ्यांची 75 लाखांची घरपट्टी माफ केली. मात्र, सातारा शहरातील कोरोना पेशंटना जी आयसोलेशन सेंटरची गरज आहे, ती तुम्ही पुरवू शकत नाही,  हे जरा आश्चर्याचे वाटते. एक नगरसेवक करु शकतो, पालिका का कमी पडते. आपली अ वर्ग नगरपालिका आहे. रहिमतपूर नगरपालिका आयसोलेशन सेंटर करते, सातारा का नाही?, अशी टीप्पणी आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार श्री.छ.उदयनराजे यांचे नाव न घेता केली.  

Advertisements

आयोध्या फेडरेशनमार्फत मोफत कोव्हिड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, नीलेश शहा आदी उपस्थित होते. शिवेंद्रराजे म्हणाले, विजय काटवटे यांनी चांगले आयसोलेशन सेंटर सुरु केले आहे. अशा आयसोलेशन सेंटरची निंतात गरज आहे. साताऱ्याचा पॉझिटीव्हीटी रेट आपण बघतोय. प्रत्येकाच्या घरामध्ये विलिनीकरणाची सोय नाही. काही लोक वन रुम किंचनमध्ये राहतात. त्यामध्ये एकाला संसर्ग झाला तर घरामध्ये इतरांना धोका निर्माण होवू शकतो. रिक्षावाले असू द्या. मंडईमध्ये विक्री करणारे असू द्या. ज्यांची घरे छोटी आहेत. घरामध्ये तो पेशंट वावरत असता तर कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थिती आयसोलेशनमध्ये ज्यांचा कमी स्कोअर आहे. अशांना जर आयसोलेशन सेंटरमध्ये राहिले तर औषधे, योग्य वेळेला आहार मिळाला, थोडा व्यायाम केला तर फार काही न करता पेशंट कोरोनातून बरा होवू शकतो. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशी आयसोलेशन सेंटर होणे गरजेचे आहे. त्याची आज सुरुवात विजय काटवटे यांनी केलेली आहे. त्यांचे प्रभागात काम आदर्शवत आहे. या आयसोलेशन सेंटरमध्ये औषधांची सोय आहे. जेवणाची सोय त्यांनी केलेली आहे. टॉयलेट, बाथरुमची सोय शाळेमध्ये केलेली आहे. छोटे ऑक्सिजन मशिनही उपलब्ध केलेले आहे. या आयसोलेशन सेंटरचा फायदा नक्कीच कोरोना पेशंटना होईल. 

काटवटे हे स्वतःच्या हिमतीवर आयसोलेशन सेंटर करु शकतात. असे प्रत्येक वॉर्डात नगरपालिकेने स्वतः केले पाहिजे. त्याची गरज आहे. नगरपालिकेच्या शाळा सगळीकडे आहेत. साताऱ्यात प्रत्येक वॉर्डात कॉलेजच्या इमारती मोकळय़ा आहेत. शाळेच्या इमारती मोकळया आहेत. मंगल कार्यालय मोकळे पडलेले आहे. छोटी छोटी आयसोलेशन सेंटर प्रभागात नगरपालिकेने उभी करणे गरजेचे आहे. गंमत एवढीच वाटते एकीकडे 75 लाखांची घरपट्टी व्यापाऱयांची माफ केली. व्यापारी अडचणीत आले त्यांना मदत म्हणून निर्णय घेतला. चांगल आहे. तुम्ही एकीकडे 75 लाख रुपये सोडता कोरोना पेशंटना तुम्हाला आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातुन सातारकरांना जी गरज आहे ती मात्र तुम्हाला पुरवता येत नाही. हे जरा आश्चर्याचे वाटते आहे. रहिमतपुर नगरपालिका करु शकते मग सातारा नगरपालिका का नाही करु शकत. हा माझा प्रश्न आहे. अजूनही नगरपालिकेने विचार करावा.

Related Stories

सातारा पोलिसांचे जुगार अन् दारू अड्डयांवर छापे

datta jadhav

सातारा : विहे गावातून घर गेले चोरीला

datta jadhav

रेशन दुकांनात रांगाच रांगा

Patil_p

संचारबंदीत ही बाजारपेठा गजबजल्या

Amit Kulkarni

आरोग्य मंत्र्यांचे आदेश पण जिल्ह्यात लसीचा खडखडाट

Patil_p

झोपलेल्या पत्नीचे डोके आपटून खून

Patil_p
error: Content is protected !!