तरुण भारत

डॉ आई-वडिलांना रूग्णांशी बोलता यावे म्हणून मुलाने तयार केला भन्नाट मास्क

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

केरळमधील त्रिशूर सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी टेकचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने अफलातून असा मास्क तयार केला आहे. हा मास्क घातल्यानंतर सहजपणे संवाद साधता यावा, यासाठी मास्कला माईक आणि स्पीकरची प्रणाली देखील जोडली आहे. आपल्या डॉ आई-वडिलांना कोणत्याही अडथळ्याविना रूग्णांशी बोलता यावे म्हणून त्याने हा भन्नाट मास्क केला आहे.

या विद्यार्थ्याचे नाव केविन जेकब असे आहे. त्याच्या कल्पनेतूनच हा भन्नाट असा मास्क उदयास आला आहे. केविनचे आई-वडील पेशाने डॉक्टर आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतेवेळी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात केविनच्या आई-वडिलांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. मास्क आणि फेसशिल्डमुळे आपण काय बोलतोय हे समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आईवडिलांना बरेच कष्ट पडत असल्याचे हे सगळ केविनच्या निदर्शनास आलं. त्यातूनच केविनला माईक आणि स्पीकर असलेला मास्क तयार करण्याची कल्पना सूचली. मग कायकेविनने एक प्रोटोटाईप मास्क तयार केला व तो आपल्या आई-वडिलांना वापरायला दिला. रुग्णालयात हा मास्क चांगलाच लोकप्रिय झाला. केविनने असे ५० मास्क तयार केले, जे दक्षिण भारतात डॉक्टरांकडून वापरले जात आहेत. या मास्कची मागणीही वाढायला लागल्यानंतर केविनने आणखी मास्क तयार करण्यास सुरुवात केली आहे.

मास्कविषयी बोलताना केविन म्हणाला की, माझ्या आईवडिलांना कोरोना काळात रुग्णांच्या सेवेत असताना रूग्णांशी संवाद साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होचा. त्यातून मला अशाप्रकारचा मास्क बनवण्याची कल्पना सुचली.

Advertisements

Related Stories

मृणाल कुलकर्णीची लवकरच खास भेट

Patil_p

मुंबईत आल्यावर कंगनाची पहिली प्रतिक्रिया…

Rohan_P

फेसबूकवर प्रेम… विवाह… नंतर…

Patil_p

महापालिका निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसची बाजी

Patil_p

अखेर फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद्येतून सुटका

tarunbharat

नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत गहू, डाळ देणार; हरियाणा सरकारचा निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!