तरुण भारत

म्युकरमायकोसिस : 18 राज्यात 5424 रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने आता देशभरात थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे 5,424 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यातील 55 टक्के रुग्णांना मधुमेह आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

Advertisements

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, देशातील 18 राज्यात म्युकरमायकोसिसचे 5,424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. एकूण 5424 रुग्णांपैकी 55 टक्के रुग्णांना मधुमेह आहे. त्यामुळे  साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसलेल्या आणि मधुमेह असलेल्या लोकांना या आजाराचा धोका जास्त आहे.    

दरम्यान, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे. तसेच शुगर लेव्हल 700 ते 800 पर्यंत पोहोचते, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.

Related Stories

कांद्याची सरकारी किंमत 22 रुपये प्रति किलो

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 92 हजार 990 वर

Rohan_P

तौक्ते चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये

Abhijeet Shinde

कुख्यात खुनी उमेश रेड्डीची फाशी कायम

Patil_p

प्रकाश आंबेडकर ‘या’ कारणासाठी तीन महिन्यांच्या सुट्टीवर

Abhijeet Shinde

डिसेंबरमध्ये जीएसटी 1.29 लाख कोटी जमा

Patil_p
error: Content is protected !!