तरुण भारत

ज्यू व्यक्तीच्या किडनीमुळे मुस्लीम महिलेला जीवदान

इस्रायलमध्ये दंगलीत मारला गेला होता ज्यू

जेरूसलेम येथे कित्येक दशकांनी झालेल्या सर्वात भयानक सांप्रदायिक दंगलींनंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरमन माणुसकीचे उदाहरण सादर करत आणि अन्य समुदायाच्या लोकांबद्दल संवेदनशीलता दाखवत त्यांच्यासोबत मित्रत्वाचे वर्तन करत आहेत, तसेच जीव गमावलेल्या स्वकीयांचे अवयव दानही करत आहेत.

Advertisements

इसायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान अरबी नागरिक आणि ज्यू धर्मीयांमध्ये प्रचंड संघर्ष झाला. मागील दोन आठवडय़ांमध्ये वाहने, रेस्टॉरंट आणि ज्यूंच्या प्रार्थनास्थळांना आगीच्या हवाली करण्याच्या अनेक घटना घडल्या.

अशा स्थितीतही इस्रायलमधील मुस्लीम महिलेवर मागील आठवडय़ात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याकरता लोड शहरात दंगलीमध्ये मारले गेलेल्या ज्यू पुरुषाच्या दान केलेल्या किडनीचा वापर करण्यात आला आहे.

जेरूसलेम येथे राहणाऱया रैंडा एवॅस (58 वर्षे) यांना दहा वर्षांपासून किडनीचा आजार होता. सात वर्षांपासून त्यांचे नाव प्रत्यारोपणाच्या यादीत नोंद होते, पण दानकर्ता न मिळाल्याने त्यांच्यावर प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. दंगली मारले गेलेल्या यिगाल येहाशुआ (56 वर्षे) यांची किडनी मिळाल्यावर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होऊ शकली आहे.

यिगाल परमार्थाच्या कार्यांवर विश्वास ठेवायचा. त्याचे मन मोठे होते आणि याचमुळे आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असे त्याचे बंधू इफी यांनी सांगितले आहे.

Related Stories

रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे खुनी : बायडेन

Amit Kulkarni

…अन्यथा 9/11 ची पुनरावृत्ती होणार

Patil_p

अश्लीलवाणीचा प्रताप, मुफ्तीच्या कानशिलात

Patil_p

ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीला मोठे यश

Patil_p

युक्रेनचे प्रवाशी विमान इराणमध्ये कोसळले, 180 प्रवाशांचा मृत्यू

prashant_c

पाकिस्तान झुकला; भारताकडे केली हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी

prashant_c
error: Content is protected !!