तरुण भारत

सुशीलकुमारला निलंबित करण्यासाठी रेल्वे खाते सज्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

छत्रसाल स्टेडियममधील एका मल्लाच्या झालेल्या खुनाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला भारतीय मल्ल सुशीलकुमार याला निलंबित करण्यासाठी रेल्वे खाते सज्ज झाले आहे. सुशीलकुमार रेल्वे खात्यामध्ये नोकरी करत आहे.

Advertisements

ऑलिंपिक पदक विजेता सुशीलकुमार याला 2015 साली दिल्ली शासनातर्फे रेल्वे खात्यात नोकरी देण्यात आली होती. उत्तर रेल्वे विभागात तो वरिष्ठ कमर्शियल व्यवस्थापकपद भूषवित आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये शालेय स्तरावर क्रीडाविकास होण्यासाठी सुशीलकुमारची या स्टेडियममध्ये खास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या या अधिकारीपदाच्या कालावधीत 2020 साली पुन्हा वाढ करण्यात आली. या कालावधीत पुन्हा वाढ मिळावी यासाठी सुशीलकुमारने अर्ज दाखल केला होता पण दिल्ली शासनाने तो फेटाळून लावला. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या हाणामारीत 23 वर्षीय मल्लाचा खून झाला होता. या घटनेनंतर काही दिवसातच दिल्ली पोलिसांनी सुशीलकुमारला अटक केली. दरम्यान रेल्वे विभागाने सुशीलकुमारला या प्रकरणी आपल्या खात्यातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सुशीलकुमारला रेल्वे खात्यातूनही बडतर्फ केले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

Related Stories

बुमराहने घेतली कोरोनाची लस

Patil_p

माझ्या नावाचा वापर अपप्रचारासाठी नको

Amit Kulkarni

रशियाचा रूबलेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

भारताकडून जर्मनीचा एकतर्फी धुव्वा

Patil_p

भारताची कांगारुंना सणसणीत चपराक!

Patil_p

नवोदित मल्लांनी महाराष्ट्राचे नाव देशाबाहेरही उज्वल करावे – राहुल आवारे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!