तरुण भारत

स्पेन फुटबॉल संघातून कर्णधार रॅमोसला डच्चू

वृत्तसंस्था/ माद्रीद

2020 च्या युरोचषक फुटबॉल स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या स्पेनच्या फुटबॉल संघातून कर्णधार सर्जिओ रॅमोसला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ऍमेरिक लेपोर्टीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Advertisements

रियल माद्रीद संघाचा कर्णधार 35 वर्षीय रॅमोसला गेल्या काही दिवसांपासून दुखापतीने चांगलेच हैराण केले आहे. चालूवर्षीच्या फुटबॉल हंगामात त्याने आतापर्यंत केवळ 5 सामने खेळले आहेत. या दुखापतीच्या समस्येमुळे रॅमोसला स्पेनच्या संघातून वगळण्यात आल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक लुईस एन्रीक यांनी दिली. युरो स्पर्धेसाठी 24 जणांचा स्पेनचा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला.

स्पेन संघ- डेव्हिड गे, सिमॉन, रॉबर्ट सांचेझ, जोस गेया, गार्सीया, लेपोर्टी, अल्बा, डी लोरेंटी, एम लोरेंटी, ऍझपीलेक्युटा, रूईझ, पेद्री,बसक्वेटस्, हेर्नांझे, कोके, लॉरेंटी, ऍलकेंट्रा, ओल्मो, ओरेझबेल, टोरेस, मॉरेनो, मोराटा, ट्रेओरी, सेराबिय.

Related Stories

माजी फुटबॉलपटू बोनेटी कालवश

Patil_p

कोल्हापूरची राही सरनोबत `वर्ल्ड नंबर वन’ !

Abhijeet Shinde

ऍशेस मालिकेचे भारतात चार भाषेत समालोचन

Patil_p

क्विटोव्हा, थिएम, सीगमंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारतीय मल्ल रविंदर प्लेऑफ गटात दाखल

Patil_p

भारताला मिश्र, पुरुष सांघिक गटात सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!