तरुण भारत

कोरोनाबाधित मिल्खा सिंग इस्पितळात

चंदिगढ / वृत्तसंस्था

मागील आठवडय़ात कोरोनाची बाधा झालेल्या महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना सोमवारी इस्पितळात दाखल केले गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मिल्खा यांचे चिरंजीव, गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी सांगितले. 91 वर्षीय मिल्खा सिंग कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर निवासस्थानीच आयसोलेशनमध्ये होते. मिल्खा यांची प्रकृती स्थिर असल्याचे इस्पितळ प्रशासनाने म्हटले आहे.

Advertisements

‘मिल्खा यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. त्यांचा अशक्तपणा वाढला आहे. रविवारपासून त्यांनी काहीही आहार घेतलेला नाही. सर्व पॅरामीटर्स ठीक आहेत. पण, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्यांना इस्पितळात आणले. येथे वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांची देखभाल करत आहे’, असे जीव मिल्खा सिंग वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

‘मिल्खा कणखर आहेत. ते नेहमी सकारात्मक रहात आले आहेत आणि कोरोनावर ते मात करतील, असा मला विश्वास वाटतो’, याचा जीवा सिंग यांनी येथे उल्लेख केला. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ‘फ्लाईंग सिख मिल्खा सिंगजी, लवकर बरे व्हा’, असा संदेश ट्वीट केला.

मिल्खा यांच्या घरातील एक मदतनीस कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर कुटुंबातली सर्व सदस्यांची चाचणी घेतली गेली. त्यात मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांच्यासह अन्य सर्व जण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मिल्खा सिंग यांचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. स्वतः मिल्खा सिंग यांनीही यावर बुधवारी आश्चर्य व्यक्त केले होते.

लिजेंडरी ऍथलिट मिल्खा सिंग चार वेळचे आशियाई सुवर्णजेते असून 1958 राष्ट्रकुल चॅम्पियनही ठरले आहेत. 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर्स फायनल इव्हेंटमध्ये चौथे स्थान संपादन केले, ही त्यांची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांना 1959 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

Related Stories

पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणे कठीण : आयोजक

Patil_p

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

मॅग्सन कार्लसन उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

पीव्ही सिंधू ऍथलिट्स कमिशनची निवडणूक लढवणार

Patil_p

पॅरिस मास्टर्समधून जोकोविचची माघार

Patil_p

नीरज चोप्रा : 87.86 मीटर भालाफेक करत पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट

prashant_c
error: Content is protected !!