तरुण भारत

आम्हालाही जगू द्या;मजुरांची आर्त हाक

ताटे वाजवून अभिनव पद्धतीने आंदोलन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

आम्हालाही जगू द्या, अशी हाक देत ग्रामीण रोजगार (कुली कार्मिक) संघटनेतर्फे सोमवारी अभिनव पद्धतीने आंदोलन करून सरकारकडे मदत मागण्यात आली. रिकामी पोती घेऊन, ताटे वाजवून हे आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे अर्थचक्र पुन्हा थांबले असून ग्रामीण रोजगार मजुरांना सरकारने 5 हजार रुपये मानधन व अन्नधान्य द्यावे, या मागणीसाठी संघटनेतर्फे बेळगाव, हुक्केरी व गोकाक या ठिकाणी अभिनव पद्धतीने आंदोलन झाले. गतवषीच्या कोरोना लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी आमची परिस्थिती बिकट झाली होती. आता पुन्हा झालेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कामे थांबली आहेत. आम्ही जगावे कसे, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला.

आंदोलनकर्त्यांनी आपल्या हातात वेगवेगळय़ा मागण्यांचे फलक घेतले होते. आम्हाला जगण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना कराव्यात, कोरोना चाचणी सर्वसामान्यांना मोफत करावी, सर्वांना लस मिळण्याची व्यवस्था करावी, गरिबांना केवळ तांदूळ नक्हे तर तेल, डाळीसुद्धा द्याव्यात. अनाथ झालेल्या कुटुंबांना 5 लाखांची मदत करावी. पीक वाया गेल्याने शेतकऱयांना मदत मिळावी, अशा मागण्या फलकांद्वारे करण्यात आल्या.

17 हून अधिक

गावांमध्ये आंदोलन बेळगाव, हुक्केरी व गोकाक तालुक्मयातील एकूण 17 हून अधिक गावांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता. महिलांनी ताटे वाजवून आणि रिकामी पोती दाखवून हे आंदोलन छेडले. सरकारने आपल्याला मानधन आणि जीवनावश्यक साहित्य द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राज्यस्तरावर या आंदोलनाचे नेतृत्व स्वर्णा भट्ट यांनी केले. जिल्हास्तरावर विश्वेश्वरय्या यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

Related Stories

प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज

Omkar B

परराज्यांतून ग्रामीण भागात येणाऱयांची संख्या वाढली

Patil_p

मटका धाडीत 1 लाख 22 हजार रुपये जप्त

Rohan_P

पीडीओंना संरक्षण द्या

Patil_p

चिकोडीत पोलिसांकडून 350 वाहने जप्त

Patil_p

हिंडलगा रोडवर अपघातात सावंतवाडीचा वृद्ध ठार

Omkar B
error: Content is protected !!