तरुण भारत

क्रिस्पी अँड क्रांची मिनी पोटॅटो पॅन केक

न्याहरीला किंवा संध्याकाळी खाण्यासाठी काहीतरी वेगळं आणि चटपटीत करायचं असेल तर क्रंची मिनी पोटॅटो पॅनकेक   ट्राय करायला हरकत नाही.

साहित्य : बटाटय़ाचा कीस एक कप, अर्धा कप तांदळाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबिर पाव कप, दोन-तीन हिरव्या मिरच्या, दाण्याचं कूट दोन चमचे, मीठ, तेल, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस.

Advertisements

 कृती : एका भांडय़ामध्ये बटाटय़ाचा कीस, तांदळाचं पीठ, कोथिंबिर, मिरच्या, दाण्याचं कूट, मीठ घाला. त्यात गरजेनुसार पाणी घालून सर्व घटक एकजीव करून घ्या. आता गॅसवर तवा ठेऊन त्यावर थोडं तेल लावा. यानंतर हे मिश्रण तव्यावर घालून त्याला टिक्कीचा आकार द्या.  सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या. अशाच पद्धतीने टिक्की बनवून घ्या. सर्व टिक्की तयार झाल्यानंतर एक टिक्की घेऊन त्यावर हिरवी चटणी लावा. त्यावर दुसरी टिक्की ठेऊन वरून टोमॅटो सॉस लावा. मग त्यावर तिसरी टिक्की ठेवा. अशा पद्धतीने पोटॅटो पॅनकेक तयार करून खायला द्या.

Related Stories

रागी कांजी

Omkar B

मँगो शिरा

Omkar B

रागी कुकीज

Omkar B

गार्लिक रस्सम

Omkar B

गाजर ज्यूस

tarunbharat

बहारदार कबाब

tarunbharat
error: Content is protected !!