तरुण भारत

टायर खराब झाल्याने शववाहिका बंद

प्रतिनिधी / कोल्हापूर :

 महापालिकेला उद्योजक व्हि.बी. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेली शववाहिका टायर खराब झाल्याने बंद आवस्थेत आहे. कोरोना मृतदेहांची संख्या वाढली असून शववाहिकेवरील ताण कमी करण्यासाठी तात्काळ टायर बदलून शववाहिका सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले आहे.

Advertisements

 कोरोनाच्या पहील्या लाटेत कोरोना मृतदेहांची वाढलेल्या संख्येमुळे महापालिकेकडे शववाहीका कमी पडत होत्या. यामुळे आमदार फंडातून दोन शववाहिका मिळाल्या तर अयोध्या ग्रुपचे व्ही बी पाटील यांनी एक शववाहिका महापालिकेला दिली होती. पहिल्या लाटेत या शववाहिकेमुळे महापालिकेवरील ताण कमी झाला. शेकडो मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीमध्ये नेऊन दहन करण्यात आले.

  दुसरी लाट सुरू झाली असून रोज 50 पेक्षा जास्त कोरोना रूग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना कावळा नाका येथे सध्या ही शववाहिका टायर खराब झाल्याने बंद आहे. इतर शववाहिकेवर ताण वाढला आहे. तात्काळ टायर बदलून शववाहीका सुरू करण्याची मागणी नगरसेवक मुल्लाणी यांनी केली आहे. दरम्यान, महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, टायर खराब झाल्यामुळे दोन दिवसांपासून शववाहिका बंद ठेवली आहे. लवकरच टायर खरेदी केली जाणार असून शववाहिका सेवेत असेल.

Related Stories

वस्त्रनगरीतील यशस्वी उद्योजक मल्लय्या दत्तात्रय स्वामी यांचे वृध्दापकाळाने निधन

triratna

कोल्हापूर : दसरा चौकात उसाच्या ट्रकने दोन दुचाकींना उडवले

Shankar_P

सांगरुळ येथे बिबट्या सदृस्य प्राण्याचे दर्शन

Shankar_P

जि.प.मध्ये घबराट,महिला कर्मचाऱयाचा पती कोरोना पॉझिटीव्ह

triratna

कोल्हापूर : किणी टोलनाक्याजवळ पोलिस आणि गुन्हेगारी टोळीत धुमश्चक्री

triratna

कोल्हापूर : रेकॉर्डवरील खुनशी वृत्तीचे आरोपी 7 दिवस स्थानबद्धत

triratna
error: Content is protected !!