तरुण भारत

विराट – अनुष्काने एक लहान मुलाच्या उपचारासाठी जमा केले 16 कोटी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी  कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठी रक्कम जमा केली आहेच, त्यानंतर आता एका लहान मुलाला या दोघांनी वैद्यकीय मदत केली आहे.

Advertisements

विराट आणि अनुष्काने एका मुलाच्या उपचारासाठी 16 कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत केली. अयांश गुप्ता या लहान मुलाला स्पायनल मस्कुलर एट्रोफी हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावरील औषध हे जगातील सर्वात महाग असे औषध आहे.


अयांशच्या उपचारासाठी 16 कोटी रुपयांची गरज होती. यासाठी देश आणि विदेशातील अनेक स्टार आणि सेलिब्रिटिंनी पुढाकार घेतला. या सर्वांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आयांशचा जीव वाचला आहे. 


अयांशच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावरून सांगितले की, आम्हाला ज्या औषधाची गरज होती ते औषध मिळाले आहे. या मेसेजमध्ये त्यांनी विराट आणि अनुष्का यांचे आभार मानले आहेत. 


पुढे ते म्हणाले, आम्ही कधी विचार केला नव्हता की इतक्या अवघड प्रवासाचा इतका सुंदर शेवट होईल. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, अयांशच्या औषधासाठी 16 कोटी रुपयांची गरज होती. ही रक्कम जमा झाली आहे. आम्ही त्या सर्व लोकांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हा तुमचा विजय आहे.


दरम्यान, अयांशच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यास विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अर्जुन कपूर, इमरान हाश्मी, सारा अली खान, राजकुमार राव आदींनी मदतीचा हात पुढे केला होता. 

Related Stories

विश्व हिंदू परिषदेतर्फे सैनिकांसाठी राखी संकलन अभियान

Rohan_P

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

Rohan_P

म्हाळूपार्वती प्रतिष्ठानकडून भाजपच्या पुस्तकाचा लाल महाल समोर निषेध

prashant_c

एसबीआयकडून कर्ज स्वस्त

Patil_p

थंडीचा कडाका कमी

prashant_c

दही घेण्यासाठी थांबवली रेल्वे…

Amit Kulkarni
error: Content is protected !!