तरुण भारत

दिल्ली : मागील 24 तासात 1,568 नवे कोरोना रुग्ण; 4,251 जणांना डिस्चार्ज!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 1,568 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 156 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात तब्बल 4,251 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 21, 739 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 19 हजार 986 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 72 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Advertisements


दरम्यान, दिल्लीत एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण संख्येने हाहाकार माजविला होता. त्यावेळी राजधानीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 99, 752 इतकी होती. सध्या हे प्रमाण कमी झाले असून सावधानी म्हणून मागील रविवारपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. दिल्लीत सध्या संसर्गाचे  प्रमाण 2.14% इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.66 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 39, 640 झोन आहेत. तर 538 कंट्रोल रूम आहेत. 

  • लसीकरणाचा डाटा 


दिल्लीत मागील 24 तासात 54 हजार 475 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 40,122 जणांना पहिला डोस 14,353 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 51 लाख 41 हजार 090 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

Related Stories

गरिबांसाठी 65 हजार कोटींची गरज : रघुराम राजन

Rohan_P

दोन दहशतवाद्यांना अनंतनागमध्ये कंठस्नान

Patil_p

निपाह व्हायरसने घेतला 12 वर्षीय मुलाचा बळी

datta jadhav

राणेंना अटक करण्याचे महाराष्ट्र सरकारचे राजकीय षडयंत्र – स्मृती इराणी

Abhijeet Shinde

18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Patil_p

कॅनडा : बंदूकधाऱ्याकडून बेछूट गोळीबार, 16 जणांचा मृत्यू

prashant_c
error: Content is protected !!