तरुण भारत

अनुकंपा भरतीबाबत चौकशीचे आदेश

प्रतिनिधी/ सातारा

 राज्य शासनाकडे सातारा जिल्हा परिषदेत मागील काही वर्षात अनुकंपा भरतीबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याभरती प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार ही करण्यात आली होती. याचीच दखल घेत आता या भरतीबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याकरीता राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने तीन सदस्यीय समितीची नेमनुक ही केली आहे. आता पुढील एक महिन्यात चौकशी प्रक्रिया पुर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.

Advertisements

 प्रारंभी जिल्हा परिषदेकडे या भरती बाबत चौकशी करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या चौकशीच्या अहवालात फेरचौकशी अवश्यक्यता असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याअनुशंगाने ही चौकशी करण्यात येत असुन यासाठी ग्रामविकास विभागाकडून एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (आस्थापना) हे समितीचे अध्यक्ष असून पूणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

 अनुकंपा भरती प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभागांनी घेतलेला निर्णय हा कर्मचाऱयांना लागु होतो. राज्यातील जिल्हा परिषदांमधील वर्ग तीन आणि चार गटांतील कर्मचाऱयांच्या सेवाविषयक बाबींच्या नियुक्तींबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना संपूर्ण अधिकार आहेत.

Related Stories

कोरोनाचा नववा बळी, सहा रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

जेईई मेन परीक्षेत गणित विषयात जयेश बागुल भारतात प्रथम

Patil_p

सातारा : राष्ट्रीय महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती

datta jadhav

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

सोशल डिस्टन्स ठेवुन नातेवाईकांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ

Patil_p

साताऱयात रविवारी रंगणार वसंतोत्सव

Patil_p
error: Content is protected !!