तरुण भारत

मनुष्याने धर्माचरणी जीवन जगणे हाच ब्रह्मानंद स्वामींचा उपदेश : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

तपोभूमीवर सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी / कुंडई

Advertisements

राष्ट्रसंत सद्गुरुदेव ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे श्रीगुरुंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. अखिल हिंदू समाजाला एकत्रित करण्याचा संकल्प पूज्य ब्रह्मानंद स्वामीजींनी केला आणि सर्व स्तरातील, जातीतील असो हिंदू म्हणून एकत्रित या असा आदेशच जणू समाजाला दिला.  गोरगरीब जनतेपर्यंत आध्यात्मकि विद्या कशी पोहचेल हा कटाक्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये बांधला. पुढे माणसे व्यसनांपासून मुक्त झाली. मोठय़ा प्रमाणामध्ये जनसमुदाय सद्गुरु चरणांकडे येऊ लागला अनंत लोक शिष्य झाली अशा लोकांना त्यांनी आत्मज्ञानाची दीक्षा प्रदान केली आणि त्यांनी आध्यात्मकि मार्गावरुन मार्गस्थ केले. कोरोना महामारी विश्वभर खूप मोठय़ा प्रमाणात थैमान घालते आहे. बरे – वाईट दिवस सर्व स्तरांवर येत जातात. काळाप्रमाणे ही दैवगती काहीना काही वाईट घेऊन येतेच. अशा काळात मनुष्याची काय कर्तव्यता ? सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी उपदेश करायचे की मनुष्याने धर्माप्रमाणे जीवन जगावं, विचार करावा. ही संपूर्ण सृष्टी परमेश्वरी आहे, मानव हा एक घटक आहे म्हणून या जगाचा पोशिंदा ईश्वर आहे. जेव्हा माणसाला माणसाची मर्यादा समजली की माणसाला कळुन चुकत आता देवाशिवाय तर्णोपाय नाही. असा उपदेश सनातन वैदिक धर्म करतो. आम्ही आमचं धर्मकार्य सुव्यवस्थितपणे केल पाहिजे. असे दिव्य संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींनी केले.

राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी नवदश पुण्यतिथी तथा धर्मभूषण सद्गुरु ब्रह्म?शानंचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण सार्धमेकं तपःपूर्ती महोत्सव दि. 24 मे रोजी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर तसेच सर्व शिष्य-अनुयायींच्या घरोघरी संपन्न झाला. त्याप्रसंगी पूज्य स्वामीजी आशीर्वचनपर संबोधित करीत होते.

पुढे पूज्य स्वामीजी म्हणाले संस्कृत भाषा, वेदाभ्यास, शास्त्राभ्यासाने मंडित ज्ञानाधि÷ित समाज निर्माण व्हावा यासाठी पूज्य ब्रह्मानंद स्वामीजींनी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या माध्यमातून वैदिक कार्याचा आरंभ गोमंतकात केला. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपले हे अमौलिक विचार त्यांनी पोहचवले. हिंदूधर्म कर्तव्य कर्म शिकवितो, आपला समाज सुशिक्षित, सुसंस्कारीत व्हावा याचहेतूने प्राचीन विद्यांचे ज्ञानदानाचे स्थान तपोभूमीच्या माध्यमातून उभे केले. असेही पूज्य स्वामीजी म्हणाले.

सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींद्वारा अक्षय्य तृतीया ते वैशाख त्रयोदशी पर्यंत वैदिक पाठशाळा बटू -उपाध्याय या सर्वांच्या माध्यमातून वैश्विक महामारी समूल नष्ट, शत्रू, चिंता, भय निवारण, दुःख, क्लेश, विनाश, स्वकुळ रक्षण तथा सर्वांना उत्तम स्वास्थ्य लाभाव याहेतूने कोरोना महामारी पासून रक्षार्थं “गायत्री मंत्र पुरश्चरण” महापूर्णाहुती या शुभदिनी पूज्य स्वामीजींच्या शुभहस्ते संपन्न झाली.

या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात गायत्री मंत्र जपानुष्ठान, गोपूजन, पूज्य सद्गुरु पूजन, ब्रह्मसत्यम् चरित्र वाचन, बटुक् स्वरुप गणेश तथा देवी स्वरुप कन्या पूजन, राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी दिव्य समाधी दर्शन, पूज्य स्वामीजींचे आशीर्वचन, गायत्री मंत्र पुरश्चरण अंतर्गत

हवनादि विधी, महापूर्णाहुती, मार्जन, तर्पण, महाआरती तर संध्याकाळच्या सत्रात धूपारती, प्रार्थना, पूज्य सद्गुरु आशीर्वचन पालखी मिरवणूक व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. समस्त शिष्य-अनुयायींनी ऑनलाइन माध्यमातून स्वगृहीच अनुष्ठानादिक धार्मिक विधी संपन्न केले.

Related Stories

कोरोना महामारी, लॉकडाऊनातही फोंडय़ात अपघाती मृत्यूत वाढ

Patil_p

शिमगोत्सव मिरवणूक तीनच ठिकाणी

Amit Kulkarni

बेंगलोर एफसीची विजयाची प्रतीक्षा अखेर ईस्ट बंगालला नमवून संपली

Amit Kulkarni

डिचोली नगरपालिकेचे सर्व 14 नगसेवक शपथबध्द

Amit Kulkarni

युतीसाठी काँग्रेसची तीन पक्षांकडे बोलणी

Amit Kulkarni

सांडपाणी निचऱयासाठी घातलेल्या जलवाहिनीचे निरीक्षण करण्यास मान्यता

Omkar B
error: Content is protected !!