तरुण भारत

येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात

धूळवाफ पेरणी करण्यासाठी लगबग सुरू : खतांचे दर वाढल्यामुळे शेतकऱयांचे बजेट कोलमडले

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

यावषी संततधार पावसामुळे शेतीमध्ये मशागत करणे अवघड झाले होते. वळिवाबरोबरच चक्रीवादळाचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱयांना शेतामध्ये काम करणे अडचणीचे ठरत होते. तरीदेखील शेतकऱयांनी मोठय़ा कष्टाने ट्रक्टर आणि बैलजोडीच्या साहाय्याने शेतामध्ये मशागत केली. त्यानंतर आता मंगळवारपासून धूळवाफ पेरणीला शेतकऱयांनी सुरुवात केली आहे.

येळ्ळूर परिसरात धूळवाफ पेरणी करण्यासाठीच दरवषी शेतकरी घाईगडबड करत असतात. मात्र यावषी जानेवारीपासूनच अधूनमधून पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱयांना मोठा त्रास सहन करावा लागला. आठ दिवसांपूर्वीच चक्रीवादळामुळे येळ्ळूर परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा अधिक झाला. त्यामध्ये मशागत करणे कठीण जात होते. तरीदेखील शेतकऱयांनी लहान ट्रक्टर आणि बैलजोडीच्या साहाय्याने शेतीमध्ये मशागत केली.

बांध बांधून त्यानंतर शेणखत विस्कटून आणि कोळपण करून शेतकऱयांनी आता धूळवाफ पेरणीला सुरुवात केली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱयांना केवळ 20 ते 25 गुंठे जमीन वाटणीला आली आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये जाऊन मदत करून ही पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत. येळ्ळूर परिसरात मजूर मिळणे कठीणच झाले आहे. त्यामुळे पैरा (एकमेकाला मदत करणे) या पद्धतीनेच शेतामधील कामे शेतकरी करत आहेत.

कुरीच्या साहाय्याने शेतकरी पेरणी करत आहेत. बासमती, इंटाण, सोनम, इंद्रायणी, शुभांगी यासह इतर जातीच्या भाताची शेतकरी पेरणी करत आहेत. भात पेरणी करताना कॉम्प्लेक्स खतांचा वापर करू लागले आहेत. मात्र यावषी खतांचे दर वाढल्यामुळे शेतकऱयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यातच डिझेल व इतर महागाई वाढल्यामुळे ट्रक्टरचे भाडे तसेच मजुरीमध्येही वाढ झाल्यामुळे शेतकऱयांना त्याचा फटका बसू लागला आहे. तरी देखील शेतकरी पारंपरिक पद्धतीने आता धूळवाफ पेरणी करताना दिसत आहेत.

Related Stories

भाजी खरेदीसाठी गेले अन् क्वारंटाईन झाले

Patil_p

कार्यशाळांमुळे शिक्षकांचा व्याप वाढणार

Patil_p

तब्बल दहा महिन्यानंतर भू-भाडे वसुलीचा आदेश

Patil_p

विनामास्क कारवाई केवळ वाहनधारकांवर?

Amit Kulkarni

लग्नाला अडसर ठरणाऱया प्रेयसीचा खून

Amit Kulkarni

खासगी कंपनीच्या बसमधून 50 लाखाची रोकड जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!