तरुण भारत

20 वाहने जप्त; विनामास्क फिरणाऱया 290 जणांवर गुन्हा

पोलिसांची हॉटेल, बेकरी, मोबाईल शॉपसह इतर व्यावसायिकांवरही धडक कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लॉकडाऊन काळात विनाकारण शहरामध्ये फिरणाऱया वाहनचालकांची 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत. विनामास्क फिरणाऱया 290 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांची ही कारवाई सुरू असली तरी अजूनही विनाकारण फिरणाऱयांची संख्या कमी होताना दिसत नाही. मंगळवारी हॉटेल, बेकरी, मोबाईल शॉपसह इतर व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली.

  कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, वेळोवेळी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी 20 वाहने जप्त करून इतर कारवाईही केली आहे. यामुळे वाहनचालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

  प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचे असताना हे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळेच कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. दररोज मोठय़ा प्रमाणात वाहने जप्त करण्यात येत आहेत. तरीदेखील जनता विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहे.

हॉटेलसह इतरांवर कारवाई

कोरोना काळात हॉटेल तसेच इतर आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. असे असताना शिवाजीनगर येथे एक हॉटेल सुरू होते. रविवारपेठ येथे इलेक्ट्रिक दुकान सुरू होते, देशपांडे गल्ली येथे बेकरी सुरू होती, कॉलेज रोड येथे मोबाईल शॉप सुरू होते, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कोरोना काळात निर्बंध असताना दुकाने उघडून हे व्यवसाय करत होते. त्यामुळे ही कारवाई केली आहे. एक इलेक्ट्रीकल दुकान सुरू होते. त्याच्यावरही कारवाई केली असून यापुढे कोणत्याही कारणासाठी दुकाने सुरू केली तर त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे.

Related Stories

कुंभारवाडा ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता

tarunbharat

रेशन कार्डधारकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचे सांगून फसविण्याचे प्रकार

Patil_p

प्रतापसिंह थोरात यांना मुख्यमंत्री पदक

Patil_p

चंदगड तालुक्यात कोरोनाचे नवे तीन रूग्ण

Patil_p

बेळगावच्या वैभवात भर घालणारी नवी सिल्क शोरुम ‘राजगणपती सिल्क’

Patil_p

कडोली साहित्य संमेलन 10 रोजी साधेपणाने होणार

Patil_p
error: Content is protected !!