तरुण भारत

जिल्हय़ातील उद्योग क्षेत्र पुन्हा रूळावर

अत्यावश्यक सेवांशी निगडीत उद्योग सुरू : 350 हून अधिक कारखान्यांना परवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

अत्यावश्यक सेवांशी निगडीत उद्योग सुरू करण्याची परवानगी बेळगाव जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर बुधवारपासून उद्योग सुरू करण्यात आले. परंतु जिल्हा औद्योगिक केंदाची (डीआयसी) परवानगी सक्तीची असल्याने जोवर परवानगी मिळाली नाही तोवर उद्योग सुरू करण्यात आले नाहीत. विकेंड लॉकडाऊनमुळे दोन दिवस सुटी होती. त्यामुळे सोमवारी परवानगी काढून मंगळवारपासून अत्यावश्यक सेवांशी निगडीत उद्योग पुन्हा रूळावर आले.

कोरोना महामारीचा धोका थांबविण्यासाठी 10 मेपासून राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे उद्योगही बंद करावे लागले होते. परंतु यामुळे अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देताना अडचणी येत होत्या. उद्योगांमधून मालाचे उत्पादन बंद असल्याने त्याचा पुरवठा कसा होणार याचा विचार करून अत्यावश्यक सेवांशी निगडीत कारखान्यांना परवानगी देण्यात आली. तसेच कामगारांना येण्या-जाण्यासाठी ओळखपत्र सक्तीचे केले आहे.

350 कारखान्यांना मिळाली परवानगी

अत्यावश्यक सेवा व साहित्य यांच्याशी निगडीत उद्योगांना डीआयसीच्या माध्यमातून परवानगी दिली जात आहे. सोमवारपर्यंत 350 हून अधिक कारखान्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी परवाना मिळविण्यासाठी उद्यमबाग येथील डीआयसी कार्यालयात उद्योजक व त्यांचे कर्मचारी यांची धडपड सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Stories

शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन

Amit Kulkarni

शेवटच्या दिवशी घुमला प्रचाराचा आवाज

Amit Kulkarni

महिन्याभरात पेट्रोल व डिझेल 10 रूपयांनी वधारले

Patil_p

हलगा सांडपाणी प्रकल्पाबद्दल महापालिकेला न्यायालयाचा दणका

Patil_p

गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Patil_p

यापुढे आम्हाला ऑक्सिजनसाठी फोन करू नये

Amit Kulkarni
error: Content is protected !!