तरुण भारत

सागर राणाच्या हत्याकांडात सुशील कुमारसोबत सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार याला अटक करण्यात आली आहे. सुशील कुमारच्या अटकेनंतर त्याच्यासोबत कटात सहभागी असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. नीरज बवाना गँगच्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटनेच्या दिवशी नीरज बवाना गँगचे गुंड तिथे उपस्थित होते. त्यांच्या मदतीने सुशील कुमारनं सागर धनकडवर हल्ला केला होता. सागर धनकड याचा मृत्यू 4 मे रोजी झाला होता. भूपेंद्र उर्फ भूपी (38), मोहित ऊर्फ भोली (22), गुलाब अका पेहलवान (24) आणि मंजीत उर्फ चुन्नी (29) अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. हे चारही जण हरयाणात राहाणारे आहेत. तसेच काला असौदा नीरज बवाना गँगचे हे सक्रिय सदस्य आहेत. दिल्लीतील कंझावला भागातून त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना हे चार जण सागर धनकड हत्येत सहभागी असल्याचं पक्की खबर देण्यात आली होती. तसेच घेवरा गावात एका साथीदाराला भेटण्यासाठी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि चौघांन बेड्या ठोकल्या आहेत.

Advertisements

Related Stories

ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार

datta jadhav

रेल्वेच्या डब्यात झाले मतदान

Patil_p

याद राखा… तर हा संभाजीराजे आडावा येईल!

Abhijeet Shinde

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

prashant_c

उरूग्वेला हरवून कोलंबिया उपांत्य फेरीत

Patil_p

एल्गार, डी कॉक यांची अर्धशतके

Patil_p
error: Content is protected !!