तरुण भारत

दिल्लीतील कोरोना : 1,491 नवे रुग्ण; संसर्ग दराचे प्रमाण 1.93 टक्क्यांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 1,491 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 3,952 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवसात  130 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


दिल्ली सरकारने बुधवारी जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यातील संसर्ग दरात घट झाली असून 2 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. जो 27 मार्च नंतर सर्वात कमी आहे. सद्य स्थितीत पॉझिटिव्हिटी दर 1.93 % इतका आहे. या सोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 20 हजारच्या खाली आली असून सद्य स्थितीत 19, 118 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 19 हजार 986 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 72 हजार 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 23,895 रुग्णांचा कोरोनामुळेे मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, दिल्लीत मागील 24 तासात 43 हजार 955 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 33,434 जणांना पहिला डोस 10,521 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 51 लाख 85 हजार 045 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

Related Stories

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

आयुर्वेदिक वनस्पती कोरोनावर 98 टक्के प्रभावी !

Patil_p

अमेरिकन कंपनी ‘KKR’ ची ‘जिओ’त 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

कोविड सेंटरमधील आगीत आंध्रात 10 रुग्णांचा मृत्यू

Patil_p

मग हे अनिल देशमुख कोण?;देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Abhijeet Shinde

अहमदाबादमध्ये कोरोनाचे 20 प्रकार

Patil_p
error: Content is protected !!