तरुण भारत

अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घेतला वाई शहराचा आढावा

सातारा / प्रतिनिधी :  

वाई शहरातही लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शुकशुकाट जाणवत होता. मंगळवारी सायंकाळी उशीरा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी वाई शहराला भेट दिली. वाई शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी मेणवली या गावास भेट दिली.  

Advertisements

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मंगळवारी दिवसभर वाई शहरात कडकडीत शुकशुकाट दिसत होता. बुधवारी सकाळपासून तिच परिस्थिती होती. मंगळवारी सायंकाळी अचानक अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांनी वाई शहराला भेट दिली. त्यांनी वाई शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. वाई शहरात बाहेरुन कोणी येवू नये आणि वाई शहरातून बाहेर कोणी जावू नये असे नियोजन केल्याचे वाई पोलीस ठाण्याचे पोली निरीक्षक आंनदराव खोबरे यांनी त्यांना माहिती दिली.

वाई शहरात बंदोबस्ताकरता 80 पोलीस कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच शहरातील किसनवीर चौक, परटाचा पार, सह्याद्रीनगर तिकाटणे आदी ठिकाणी बंदोबस्त आहे. बाहेरुन येणाऱ्या वाहनांची नोंद घेतली जाते आहे काय?, कारवाई केली जाते आहे काय याची त्यांनी माहिती घेतली. धीरज पाटील यांनी सुचना देत पुढे मेणवली या गावास भेट देवून तेथील घरी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.

Related Stories

फेसबुक ओळख असणाऱ्या महिलेचे अश्लील छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी एकास अटक

Abhijeet Shinde

देशात 18,645 नवे बाधित, 201 मृत्यू

datta jadhav

सदरबझारात पावसात रस्त्याचे काम सुरू

Patil_p

लसीकरण न झाल्यास काम बंद आंदोलन

datta jadhav

सातारा : मंदिर सेवेकऱ्याचा भक्तांना अडीच लाखाला गंडा

Abhijeet Shinde

नदीत आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

datta jadhav
error: Content is protected !!