तरुण भारत

अदानी यांचे समभाग दोन दिवसांपासून घसरणीत

मुंबई

 अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा श्रीमंताच्या यादीमधील स्थान घसरले आहे. जगातील धनाढय़ांच्या यादीमध्ये ते 15 व्या स्थानी पोहोचले आहेत. तर रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांनी 13 वे स्थान प्राप्त केले आहे. मंगळवार व बुधवारच्या सत्रामधील कामगिरीनंतर त्यांच्या कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाल्याने हा परिणाम पहावयास मिळाला आहे.

Advertisements

ब्लूमबर्ग बिलिनेयर निर्देशांकाच्या अहवालानुसार चीनचे अब्जाधीश झेंग शैनशैन पुन्हा एकदा 14 व्या नंबरवर कायम राहिले आहेत. या अगोदर गौतम अदानी यांनी हे स्थान प्राप्त केले होते. अदानी ट्रान्समिशनचे समभाग हे 5 टक्क्यांनी घसरत 1378 रुपयावर राहिले आहेत. तसेच ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवरही घसरणीतच ट्रेडिंग करत आहे. मात्र अन्य तीन कंपन्या अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्राईजेस आणि अदानी पोर्टचे समभाग मात्र तेजीसह व्यवहारात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

कर्जासाठी आयबीएचा नवीन प्रस्ताव

Patil_p

भारत फोर्जचा पॅरामाउंट ग्रुपशी करार

Patil_p

एअरटेल-रिलायन्स जिओ नफ्यात राहण्याचे संकेत

Patil_p

कच्च्या तेलाची आयात घसरली

Patil_p

फॅशन ब्रँडस्ची ऑनलाईन विक्री प्रभावीत

Amit Kulkarni

बाजारात 10 पैकी 6 कंपन्यांचे भांडवल 92 हजार कोटीने घटले

Patil_p
error: Content is protected !!