तरुण भारत

फ्लिपकार्ट ग्राहकांच्या सुविधांवर देणार भर

पुरवठा विभागासह अन्य विभाग करणार मजबूत

मुंबई

Advertisements

 ऑनलाईन व्यवसायात कार्यरत असणारी फ्लिपकार्ट कंपनी येत्या काळात आपला व्यवसाय अधिक भक्कम करणार आहे.  कंपनीने मागील तीन महिन्यांपासून 23 हजार लोकांना रोजगार प्राप्त करुन दिला आहे. सदर रोजगारात पुरवठा साखळी, डिलिव्हरी विभागासह अन्य ठिकाणी भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून ऑनलाईन ऑर्डर्समध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत गेली आहे. यामुळे अलीकडे उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागणीनुसार वस्तुंचा आवश्यक तो पुरवठा करण्यासाठी अतिरीक्त व्यक्तिंची भरती केली जात आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे फ्लिपकार्ट विविध विभागात बदल करण्यावर भर देणार असून यासाठी  प्रयत्न करणार आहे.

आरोग्य सेवा मिळणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सर्व नवीन कर्मचाऱयांना हेल्थकेअर आणि वेलनेस या सेवा देणार आहे. कोरोनाच्या प्रभावात त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

व्हर्चुअल प्रशिक्षण

कंपनीत नवीन रुजू होणाऱया कर्मचाऱयांना व्हर्चुअल स्वरुपात क्लासरुम सेवा उपलब्ध करत डिजिटल पद्धतीने प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणांर्गत कंपनीच्या पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनाची माहिती करुन दिली जाणार आहे.

विविध केंद्रावर शॉपिंग सुविधा

सदरच्या अतिरीक्त पायाभूत सुविधांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट दिल्ली, कोलकाता, चेन्नई, कोइमतूर आणि हैदराबाद यासारख्या केंद्रावर जास्तीत जास्त ऑनलाईन शॉपिंगची सुविधा सादर करण्यास सक्षम होणार आहे. याच्या आधारे जवळपास 73,000 पेक्षा अधिकच्या ग्रॉसरी ऑर्डर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

‘स्टेट बँके’चं‘सुकाणू’ नव्या चेहऱयांकडे!

Omkar B

ऍमनेस्टी इंटरनॅशनलनेभारतामधील काम थांबवले!

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 478 अंकांची उसळी

Patil_p

करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर दाखल करण्याच्या मुदतीत वाढ

Rohan_P

जूनमध्ये 4.27 कोटी ई-वे बिलाचे सादरीकरण

Patil_p

ऍपल इंडियाचा महसूल 29 टक्क्यांनी वधारला

Omkar B
error: Content is protected !!