तरुण भारत

शेअर बाजारात मजबूत तेजीची नोंद

इन्फोसिस, टीसीएस मजबूत ः सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या घसरणीनंतर पुन्हा तेजीचा माहोल राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीमध्ये प्रामुख्याने इन्फोसिस, एचडीएफसी आणि टीसीएस यासारख्या मोठय़ा कंपन्यांचे समभाग वधारल्यामुळे व आशियातील बाजारांमधील सकारात्मक संकेतामुळे बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 380 अंकांनी मजबूत राहिल्याची नोंद केली आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 379.99 अंकांनी वधारुन निर्देशांक 51,017.52 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 93 अंकांच्या वाढीसोबत निर्देशांक 15,301.45 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी वाढले असून अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि एचडीएफसीचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, ओएनजीसी आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले.

अभ्यासकांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणात्मक संकेत मिळत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास परतला आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण राहिल्याचेही नमूद केले आहे. दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्समध्ये धातू हे क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील निर्देशांक लाभात राहिले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बुधवारी उत्साह दिसून आला. बरेचसे बाजार हे तेजीत होते.  आशियातील बाजारामध्ये शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेग आणि जपानचा निक्की हे बाजार तेजीत राहिले आहेत. पण दुसरीकडे सियोल कॉस्पीमध्ये घसरण राहिली आहे.

Related Stories

केरळमध्ये पहिल्यांदाच ट्रांसजेंडर उमेदवार

Patil_p

‘एचपी’च्या कॉम्प्युटर्सना मागणी वाढली

Patil_p

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

Omkar B

‘वाडीलाल’चे 800 कोटींचे विक्रीचे उद्दिष्ट

Patil_p

एमएसएमइएसला 8,320 कोटींचे कर्ज वितरण

Patil_p

हवाई इंधन दरात 2 टक्क्यांनी वाढ

Patil_p
error: Content is protected !!